December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

शिक्षण परीषद पूष्प पहिले संपन्न

कल्याण

शासन परिपत्रकानुसार जि.शि.प्र.स ठाणे व कल्याण-डोंबिवली महापालिका शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण परिषद पूष्प पहिलेचे नियोजन १ जुलै रोजी प्रशासन अधिकारी विजय सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

कल्याण पुर्व, कल्याण पश्चिम, डोंबिवली पूर्व व पश्चिम, टिटवाळा या चार विभागांमध्ये सर्व २१ सीआरसी अंतर्गत ५९ मनपा शाळा मधून १९७ शिक्षक उपस्थीत होते. शिक्षण परिषदेतील विषय विद्याप्रवेश, शालेय अभिलेख, शालेय स्तरावरील समित्या, एकात्मिक पाठयपुस्तकचा वापर, शिक्षक पर्व प्रश्नपेढी, सेतू अभ्यासक्रम, बाल रक्षक, प्रशासकीय कामकाज हे विषय तज्ञांमार्फत सुलभ पध्दतीने सर्व शिक्षक वृदां पर्यत पोहाचावेत या उद्देशाने प्रशासन अधिकारी विजय सरकटे व कार्यक्रम अधिकारी अर्चना जाधव यांनी विभाग निहाय नियोजन केले.

विभाग निहाय शिक्षण विस्तार अधिकारी यांनी भेटी देऊन मार्गदर्शन केले. शिक्षण परिषद समन्वयक म्हणून विषयतज्ञ प्रदीप भोईर यांनी कामकाज पाहीले. सीआरसी प्रमुखांचे मार्गदर्शन प्रत्येक विभागात लाभले. प्रशासकीय कामकाज बाबत विषयतज्ज्ञांचे व सीडब्लयूएसएन विषयाबाबत विशेषतज्ञ व विशेष शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. उपस्थित सर्व शिक्षकांना वरील विषयांचे उत्तम मार्गदर्शन मिळाले या बाबत सर्व शिक्षकांनी समाधान व्यक्त केल्याचे प्रशासन अधिकारी विजय सरकटे यांनी सांगितले.