December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

चॅटबॉटने सुविधा देणारी देशातील पहिली जिल्हा बँक

सिंधुदुर्ग

महाराष्ट्रातील अग्रगण्य जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असलेली सिंधुदुर्ग जिल्हा बँक पुन्हा एकदा इतिहास घडविण्यासाठी सज्ज झाली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ग्राहकांशी थेट संवाद साधता येणाऱ्या चॅटबॉट तंत्रज्ञानाचा आज बँकेच्या ४० व्या वर्धापनदिनी लोकार्पण सोहोळा नुकताच सिंधुदुर्गमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते बँकेचे सिंधु चॅटबॉट, मायक्रो ए .टी. एम, मोबाईल बँकिंग सुविधांचा शुभारंभ करण्यात आला.

प्रचारतंत्र या संस्थेने हा चॅटबॉट विकसित केला असून त्याबाबत माहिती देताना प्रचारतंत्रचे प्रवर्तक कुणाल गडहिरे यांनी सांगितले की ओम्नीचॅनल पद्धतीचा चॅटबॉट आहे. याचा अर्थ एकच चॅटबॉट बँकेच्या वेबसाईट, फेसबुक पेज, इन्स्टाग्राम पेज आणि व्हॉट्सअपवरून संवाद करू शकतो. प्रचारतंत्र चॅटबॉटचे इतर चॅटबॉटपेक्षा वेगळे वैशिष्ट्य सांगताना गडहिरे म्हणाले की प्रचारतंत्र चॅटबॉटच्या पाठीशी चॅटजीपीटी तंत्रज्ञान असल्याने तो स्मार्ट चॅटबॉट आहे. आणि वापरकर्त्याच्या प्रश्नाचा रोख आणि त्यातील मथितार्थ त्याला कळतो आणि त्या प्रमाणे समर्पक उत्तरे ग्राहकाला मिळतात.

महाराष्ट्रातील सहकारी बँकिंग क्षेत्रात “सर्वप्रथम” अशा अनेक सुविधा बँकेनेच सुरु केल्या आहेत यात प्रामुख्याने स्वतः चे अत्याधुनिक डेटा सेंटर असलेली पहिली सहकारी बँक, ग्राहकांना थेट कर्ज पुरवठा करणारी पहिली जिल्हा बँक, युपीआय लाईव्ह सेवा देणारी महाराष्ट्रातील पहिली जिल्हा बँक, गरीबांच्या आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखवणारी मायक्रो फायनान्स करणारी पहिली जिल्हा बँक, हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून फास्टटॅगसाठी लायसन्स मिळालेली पहिली जिल्हा बँक, पर्यावरण स्नेही ग्रीन चॅनल काउंटर सेवा व डोअर स्टेप बँकिंग सुविधा निर्माण करणारी पहिली जिल्हा बँक, 365 दिवस 24 तास ग्राहक सेवा देऊ शकणारी आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉवर्ड चॅटबॉट सुविधा देणारी देशातील पहिली जिल्हा बँक ठरली आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी दिली.