April 16, 2025

news on web

the news on web in leading news website

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मार्गदर्शन

कल्याण

पूर्वेतील नूतन विद्यालय येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कल्याण शाखा तर्फे कार्यक्रम घेण्यात आला. लैंगिकता प्रबोधन सप्ताह या अंतर्गत किशोरवयीन मुलींना ‘वयात येताना’ या विषयावर संवादक डॉक्टर सुषमा बसवंत यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांनी या काळातले शारीरिक बदल, मानसिक आरोग्य आणि सामाजिक बदल समजावले.

प्रास्ताविक प्रज्ञा चव्हाण यांनी केले. मंगल मोरे यांनी आभार मानले. या उपक्रमाला मुलींचा प्रतिसाद चांगला होता. शेवटी शंका निरसन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पीएसआय अनंत कदम,  पीएसआय विश्वासराव जाधव आणि त्यांचे सहकारी,  दुहिता जाधव हे उपस्थित होते. मुख्याध्यापिका मिनाक्षी गागरे, अस्मिता सावंत आणि प्रज्ञा म्हाळुंगे यांनी सर्वतोपरी सहकार्य केले.