December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

मी चंपा… येतेय तुमचं मनोरंजन करायला

मागील काही दिवसांपासून मीरा जोशी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली होती. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर बॉयफ्रेंडबरोबरचा फोटो शेअर करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. यामुळे ती लवकरच लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा सर्वत्र रंगली होती. पण हे सगळं खोटं ठरलं. माझ्या एकटीचा बॉयफ्रेंड या गाण्याच्या प्रमोशनचा हा भाग असल्याचे नंतर लक्षात आलं.

 

आता मीरा झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेत झळकणार असल्याचं समोर आलं आहे. मीराने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. या व्हिडीओत मीरा ‘चंद्रा’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. तसेच तिच्याबरोबर अभिनेते शरद पोंक्षे देखील पाहायला मिळत आहे. मीरा आता ‘झी मराठी’वरील ‘दार उघड बये’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे. हा व्हिडीओ शेअर करत मीराने लिहीलं आहे की, “मी ‘चंपा’ येतेय तुमचं मनोरंजन करायला उद्यापासून रोज रात्री ८.३० वाजता. मालिका ‘दार उघड बये’मध्ये.

अभिनेत्री मीरा हिने मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनय आणि नृत्याने वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मालिका, चित्रपट तसेच रिअ‍ॅलिटी शोमधून ती घराघरात पोहोचली आहे.