असिस्टंट ब्युटी पार्लर आणि मेकअप आर्टिस्टचे प्रशिक्षण
कल्याण
कल्याणमधील स्टडी वेव्हज बहुउद्देशीय संस्था संस्थेच्या माध्यमातून असिस्टंट ब्युटी पार्लर आणि मेकअप आर्टिस्टचे प्रशिक्षण हे रायगड जिल्ह्यातील महाड मधल्या बिरवाडी येथे ४५ प्रशिक्षणार्थीना देण्यात आले. या प्रशिक्षणार्थीना संस्थेच्यावतीने प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. प्रमाणपत्र वितरण सोहळा बिरवाडी येथील ब्राह्मण सभागृहात पार पडला.
हे प्रशिक्षण समर्थ कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत देण्यात आले असून याचा प्रशिक्षण कालावधी तीन महिन्याचा होता. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेविका अक्षदा भोसले उपस्थित होत्या. तसेच प्रशिक्षिका रेश्मा कापडेकर यांनी पूर्ण कार्यक्रमाचे संचलन केले. स्टडी वेव्हज बहुउद्देशीय संस्थाचे अध्यक्ष उमाकांत चौधरी यांनी सर्वे सर्व उमेदवारांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचे सांगता केली.
आणखी बातम्या
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न
पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ ॲक्टिव्ह