December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी नेहाची निवड

तिसगावमधील पहिली महिला कुस्ती पैलवान

कल्याण

कल्याण डोंबिवली महानगरपालिका शालेय जिल्हासस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये तिसगाव मधील पहिली महिला कुस्ती पैलवान नेहा गायकवाड हीची विभागीय कुस्ती स्पर्धेमध्ये निवड झाली आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद ठाणे व कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ७३ किलो वजनी गटात तिसगांव येथील रहिवासी आणि सेंट थॉमस शाळेची विद्यार्थिनी नेहा गायकवाड हिने प्रथक क्रमांक पटकावला आहे. या विजयामुळे नेहा हीची निवड विभागीय कुस्ती स्पर्धेमध्ये निवड झाली आहे.

नेहा हि जय गावदेवी कुस्ती संकुल पिसवली येथे अध्यक्ष श्रीपत भोईर यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षक रंगराव हरणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. नेहा हिच्या सोबत जय गावदेवी कुस्ती संकुलातील प्रियदर्शनी ठाकूर, सानवी पाटील, भूमी भोईर, विराज हरणे या खेळाडूंची देखील विविध वजनी गटांमध्ये विभागीय कुस्ती स्पर्धेमध्ये निवड झाली असल्याची माहिती नेहाचे वडील अनंता गायकवाड यांनी दिली.