December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

कला शिक्षक विनोद शेलकर यांनी केले मार्गदर्शन

कल्याण

आजपासून एलिमेंट्री परीक्षेला सुरुवात होत आहे या परीक्षेची पूर्वतयारी म्हणून पोटे ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना लास्ट मोमेंट प्रॅक्टिस, टिप्स अँड ट्रिक्स देण्यासाठी कल्याण तालुका कलाध्यापक संघाचे सचिव, गुरुनानक इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज कल्याण येथील कलाशिक्षक विनोद शेलकर यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

विनोद शेलकर यांचा 14 वर्ष एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट परीक्षांचे परीक्षण करण्याचा अनुभव आहे तसेच सात वर्षापासून ते एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट परीक्षेसाठी मॉडरेटर म्हणून काम करत आहेत. याच त्यांच्या परीक्षणाच्या अनुभवाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा व्हावा आणि पेपर देत असताना विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या सूक्ष्मचुकांमुळे त्यांच्या गुणांवर, ग्रेडवर कसा परिणाम होतो आणि या चुका आपण कशाप्रकारे टाळू शकतो याचं मार्गदर्शन यावेळी विनोद शेलकर यांनी केले. यासोबतच वस्तूचित्र, स्थिरचित्र रेखाटन आणि रंगकाम कसे करावे, दोन रंग एकमेकांमध्ये मिसळण्यासाठी कोणत्या टेक्निक चा उपयोग सहजरित्या करता येतो याचं उत्तम मार्गदर्शन यावेळी अनेक विद्यार्थ्यांना करण्यात आले.

यावेळी पावर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून अनेक चित्र रेखाटन आणि संदर्भ चित्र विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. प्रत्यक्षरीत्या रंग मिक्सिंग कशा पद्धतीने आपण सहज रित्या करू शकतो हे सुद्धा विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. निश्चितच या सर्वांचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेत होईल अशी आशा विनोद शेलकर यांनी व्यक्त केली आहे.