कल्याण
भाल गावातील शिक्षक जीवन मढवी यांच्या घरगुती गणेशोत्सव निमित्त दहा दिवस जागर मराठी शिक्षणाचा या उपक्रमांतर्गत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेत अशोक तारमळे, निलेश वाबळे, अजय पाटील, सुरेखा जाधव, विश्वास भोईर, पुंडलिक पाटील, दिग्विजय पाटील, अजय जोगी यांनी ‘मराठी शाळा वाचवा’ या विषयावर आपले विचार मांडले.
मढवी यांनी भाविकांना आवाहन केले होते की, गणेश दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी हार, केळी, फुले, नैवेद्य वा लाडू न आणता बाप्पा चरणी वही, पेन, पेन्सिल, खोडरबर वगैरे शैक्षणिक साहित्य अर्पण करावे. या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला. जमा झालेले शैक्षणिक साहित्य नुकताच जिल्हा परिषद शाळा भाल येथील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. त्यावेळी मराठी शाळा वाचवा मोहिमेचे प्रमुख जीवन मढवी, ग्रामस्थ अंकुश चिकणकर, गजानन म्हात्रे, महादू म्हात्रे, अशोक तारमळे मुख्याध्यापक शाळा भाल आणि शिक्षकवृंद उपस्थित होते. या संपूर्ण उपक्रमाची ठाणे जिल्हयात चर्चा होत आहे.
आणखी बातम्या
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न
पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ ॲक्टिव्ह