December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

शुक्रवारी कल्याण डोंबिवलीत पाणी नाही

कल्याण

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या १५० द.ल.ली. मोहिली उदंचन केंद्र (नेतिवली ज. शु.के.) व १०० द.ल.ली. मोहिली जलशुद्धीकरण केंद्रास महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. मार्फत टाटा पॉवर कांब सबस्टेशन येथुन विद्युत पुरवठा केला जातो. टाटा पॉवर कांबा सबस्टेशनमधील फीडरच्या देखभाल व दुरुस्तीचे काम करण्याकरिता येत्या शुक्रवारी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत विज पुरवठा खंडित राहणार आहे.

तथापि या दिवशी १५० द.ल.ली. मोहिली उदंचन केंद्र ( नेतिवली ज.शु.के.) व १०० दल.ली. मोहिली जलशुद्धीकरणामधून कल्याण ग्रामिण विभाग (टिटवाळा वडवली विली शहा अटाळी व कल्याण ग्रामीण विभागातील इतर गावे) व डोंबिवली (पूर्व व पश्चिम ) तसेच कल्याण पश्चिम विभागामधील भोईरवाडी, रामबाग, चिकणघर, घोलपनगर, मिलिंदनगर, योगीधाम, मुरबाड रोड, अशोक नगर, वालधुनी, शिवाजी नगर, जोशी बाग, बिर्ला कॉलेज ते खडकपाडा रोड व कल्याण स्टेशन परिसर या भागात होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य साठा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता राजू राठोड़ यांनी केले आहे.