December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

विविध समस्यांबाबत मनसेने घेतली आयुक्तांची भेट

कल्याण

ठाणकर पाडा, बेतूरकर पाडा, फडके मैदान, काळा तलाव व शेजारील इतर परिसरात वर्षानुवर्षे पाणीटंचाईमुळे होणाऱ्या त्रासातून नागरिकांची लवकरात लवकर सुटका व्हावी याकरीता मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्यासमवेत शाखा अध्यक्ष गणेश लांडगे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेऊन जलकुंभाचा विषय मार्गी लावण्याची मागणी केली. यावर आयुक्तांनी लवकरच जलकुंभाची बनविण्याचे आश्वासन दिले.

माता रमाबाई आंबेडकर उद्यान शेजारी जलकुंभासाठी आरक्षित भूखंड असून या भूखंडावर जलकुंभ बांधण्यात यावे. प्रभागामध्ये अनेक ठिकाणी जलवाहिनी भूमिगत असून हि जलवाहिनी भूमीलगत करून देणे, हि पाण्याच्या लाईन मलनिसारण लाईन मधून गेल्याने दुषित पाणी पुरवठा प्रभागात बऱ्याच ठिकाणी होत आहे. प्रभाग क्र. २९ ठाणकर पाडा, दुर्गा नगर परिसरात राजा सावंत यांच्या कार्यालयासमोर मार्शल बसविणे. आजूबाजुला दोन शाळा आहेत. बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत असते. भविष्यात दुर्घटना घडू नये अशी मागणी मनसेच्या वतीने आयुक्तांकडे करण्यात आली आहे.