December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांना केडीएमसीतर्फे आदरांजली

कल्याण

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे आज त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. या समयी महापालिका सचिव तथा उपायुक्त वंदना गुळवे, उपायुक्त अर्चना दिवे, स्वाती देशपांडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिग्विजय चव्हाण, विभागप्रमुख (माहिती व जनसंपर्क) संजय जाधव, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, प्रशांत भागवत, किरण वाघमारे, जगदीश कोरे, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सहा.आयुक्त हेमा मुंबरकर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी देखील पुष्पसुमने अर्पण करून आदरांजली वाहिली.

पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. या समयीमा जी महापौर रमेश जाधव, पालिका सदस्या रेखा जाधव तसेच इतर अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

तसेच डोंबिवली विभागीय कार्यालयालगतच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास तसेच फ प्रभाग कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस परिमंडळ-२ चे उपायुक्त अवधुत तावडे यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. या समयी सहा.आयुक्त चंद्रकांत जगताप तसेच इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.