December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

कल्याण पूर्वेतील वाचन उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

लेखक दिग्दर्शक नीलमाधव आणि स्टडी वेव्हज् बहुउद्देशिय संस्थेचा उपक्रम

कल्याण

लेखक दिग्दर्शक नीलेश पाटील (नीलमाधव) आणि स्टडी वेव्हज् बहुउद्देशिय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण पूर्वेत आयोजित करण्यात आलेल्या वाचन उत्सवाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ६ ते १० डिसेंबर दरम्यान कल्याण पूर्वेतील तिसगांव येथे या वाचन उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या उत्सवाला कल्याण डोंबिवली मधील अनेक वाचकांनी, मान्यवरांनी, उद्योजकांनी व विद्यार्थ्यांनी सहर्ष भेट देत निवांतपणे अनोख्या लेखकांची पुस्तके वाचली. उत्सवाच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ कवयित्री सुरेखा गावंडे, स्टडी वेव्हज् एनजीओचे संस्थापक उमाकांत चौधरी, ज्ञानेश्वर माऊली ग्रंथालयाचे अध्यक्ष तानाजी सहाने उपस्थित होते. शिवाय उद्योजक तरूण पाटील, संतोष लामखेडे, राहुल चव्हाण, रोहिदास पाटील, पोलीस हवालदार रूपाली पाटील असे अनेक मान्यवर वाचनाचा आनंद घेण्यासाठी आले. दिल्ली नोएडा येथून उद्योजक लेखिका मानसी अगरवालही आल्या होत्या.

वाचन उत्सवाच्या शुभारंभी ज्येष्ठ कवयित्री सुरेखा गावंडे यांच्या हस्ते गुज मनीचे या कवयित्री यामिनी पाटील यांच्या प्रथम काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. उत्सवाच्या दुस-या दिवशी, अनेक बाल तरूण, वृद्ध वाचक वाचनासाठी आले. आनंद ग्लोबल स्कूल, लोकधाराचे विद्यार्थ्यांनी एक तास वाचन उत्सवाचा पुरेपूर आनंद घेतला. तिस-या दिवशी मानसशास्त्र तज्ञ अमर इखे, आदर्शम् मानव हक्क आयोगाचे राष्ट्रीय मुख्य सचिव रामचंद्र मोहिते यांनी पुस्तकांचे सविस्तर निरीक्षण केले. सॅटर्डे क्लब या उद्योग समूहातून उद्योजकही आवर्जुन आले. रॉयल हायस्कूल, कल्याणचे विद्यार्थीही वाचन उत्सवात आले. चौथ्या दिवशी श्री दत्त डेवलपर्सचे अध्यक्ष सुनिल गायकवाड सपत्निक वाचन उत्सवात आले.

वी. के मेमोरियल लायब्ररीच्या लायब्ररीयन सुनिता रंगारी व जयेश रंगारी यांनीही वाचनाचा आनंद घेतला. पाचवा व शेवटचा दिवशी गणेश विद्या मंदिरचे काही विद्यार्थीही आले. विशेष म्हणजे सिंगापूर वरुन लेखिका आचार्य लता दत्ता खास कल्याण पूर्वेला वाचन उत्सव पाहण्यासाठी आल्या. विशेष भेट दिली ते अनुलोम संस्थेच्या सह-विभाग प्रमुख प्रेरणा पवार, कोकण विभाग व भाग जनसेवक अर्जुन भाबड, कल्याण यांनी. शेवटी उपस्थित सर्व वाचक, लेखकांनी एकत्रितपणे या उत्सवाची सांगता केली. सांगते समयी निलमाधव यांनी ज्यांनी हा वाचन उत्सव उभारण्यासाठी योगदान दिले अशा वाचकांसह सर्व उद्योजकांचेही आभार मानले.