December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

एसएसटी महाविद्यालयाचे बॉक्सिंग स्पर्धेत यश

कल्याण

मुंबई विद्यापीठ ठाणे स्पोर्ट्स कमिटी, अचिव्हर्स कॉलेज कल्याण आणि ठाणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेत एसएसटी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करत भरघोस यश संपादन केले.

यात शुभम बिस्त याने सुवर्ण पदकाची कमाई केली. तर सुवेद बुबेरे याने रौप्य पदकावर आपले नाव कोरले. तसेच अनंत तायडे यानेही आपले कसब दाखवत कांस्य पदकाची कमाई केली. या वैयक्तिक कामगिरी सोबतच एसएसटी महाविद्यालयाने सांघिक द्वितीय चॅम्पियनशीप प्राप्त केली.

त्यासोबतच यातील शुभम बिस्त आणि सुवेद बुबेरे या खेळाडूंची आंतर विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. यांना कोच ऋषिकेश कापसे यांनी मार्गदर्शन केले. या सर्व यशस्वी खेळाडूंचे सर्वांकडून कौतुक होत आहे.