December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

संविधान सन्मान दिवस साजरा

कल्याण

कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेच्या वतीने बुधवारी “संविधान सन्मान दिवस” कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रांगणात दुपारी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश कल्याण जिल्हा व सत्र न्यायालय शिवाजी कचरे, प्रमुख वक्ते वरिष्ठ ॲड. एफ एन. काजी, प्रमुख पाहुणे कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयातील सर्व न्यायाधीश आणि दिवाणी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. सुदेश गायकवाड उपस्थित होते.

संविधान सन्मान दिनानिमित्त सर्व प्रथम भारतीय संविधानाच्या सरनामाचे वाचन प्रथम वर्ग न्यायाधीश तथा दिवाणी न्यायाधीश राउळ यांनी केले. ॲड. एफ एन काझी, दिवाणी वकील संघटना कल्याण अध्यक्ष ॲड. सुदेश गायकवाड, कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटना अध्यक्ष ॲड. प्रकाश जगताप, आणि जिल्हा न्यायाधीश शिवाजी कचरे यांनी संविधानावर आपले विचार प्रकट केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.चंद्रकांत वाघमारे यांनी केले तर ॲड. अभिन गायकर, संघटना,यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच वकील सभासद, पक्षकार उपस्थित असल्याची माहिती ॲड. प्रकाश जगताप यांनी दिली.