December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

आरोग्य तपासणी शिबिरात ४०८ नागरिक लाभान्वित

नेव्ही नगर

निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या शिकवणूकीनुसार मानवता व विश्वबंधुत्वाचे उदात्त आध्यात्मिक करण्याबरोबरच मानवमात्राचे आरोग्य, समृद्धी आणि सशक्तीकरणाचे ध्येय समोर ठेवून विविध सामाजिक सेवांमध्ये आपले योगदान देत असलेल्या संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने रविवारी संत निरंकारी सत्संग भवन, नेव्ही नगर येथे आयोजित मोफत आरोग्य शिबिरात 408 नागरिक लाभान्वित झाले.

गणेश मूर्ती नगर हा एक झोपडपट्टीचा भाग असून तेथील कित्येक नागरिक आर्थिक दुर्बलतेमुळे स्वत:ची आरोग्य तपासणी करु शकत नाहीत. त्यामुळे अशा नागरीकांना मोफत आरोग्य तपासणी करण्याची सुविधा या शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आली ज्याचा गरजू नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. या शिबिरामध्ये सामान्य आरोग्य तपासणी व्यतिरिक्त वक्ष तपासणी, मधूमेह, बालरोग, अस्थिव्यंग, फिजिओथेरपी, स्त्रीरोग, गर्भाशय कर्क रोग, ह़दय रोग, दंत परीक्षण आणि नेत्र चिकित्सा इत्यादि आरोग्याबाबतच्या विविध क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची तपासणी करुन त्यांना उचित उपचारांसह आवश्यक ते मार्गदर्शनही केले.

या शिबिराचे उद्घाटन प्रचार-प्रसार को-ऑर्डिनेटर डॉ.दर्शन सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिराला सदिच्छा भेट देणाऱ्या मान्यवरांमध्ये शिवसेना उपनेता राजकुमार बाफना, माजी नगर सेवक मकरंद नार्वेकर आणि पूरन दोशी यांचा समावेश होता. संत निरंकारी मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक हाकिम सिंह यांनी स्थानिक सेवादल युनिट व संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांच्या सहयोगाने या शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन केले.