ठाणे
श्री माँ ट्रस्ट संचालित श्री माँ विद्यालय ऑफ घोडबंदर रोड, पातलीपाडा या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 19 व्या आंतरशालेय लोककला नृत्यस्पर्धेत पवार पब्लिक स्कूल, भांडूपने प्रथम क्रमांक पटकाविला.
विविध 11 शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. 175 विद्यार्थ्यांनी दर्शवलेला लोककलेचा नेत्रदिपक नृत्याविष्कार उत्कृष्टपणे सादर केला गेला. या नृत्यस्पर्धेच्या परीक्षणासाठी बाहेरील लोककला नृत्यतज्ञ परीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती.
ग्रामीण व शहरी लोककलांची संकल्पना बालमनात रूजावी आणि लोककलांचा मौल्यवान सांस्कृतिक ठेवा महाराष्ट्रात चिरकाल जपून ठेवावा या सद्हेतूने या आंतरशालेय लोककला नृत्य स्पर्धेचे वर्षानुवर्ष आयोजन केले जात आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना श्री माँ ट्रस्टचे चेअरमन गोपाल यांच्या हस्ते बक्षीसे वितरीत करण्यात आली.
द्वितीय क्रमांक – एन. के. टी. स्कूल, खारघर.
तृतीय क्रमांक – श्रीरंग विद्यालय, इंग्रजी माध्यम.
प्रोत्साहनार्थ – श्रीरंग विद्यालय, डॉन बॉस्को.
उत्कृष्ट कोरीओग्राफर – श्री माँ विद्यालय, पवार पब्लिक स्कूल, एन. के. टी. इंग्रजी माध्यम.
आणखी बातम्या
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न
पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ ॲक्टिव्ह