December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

आनंद हा मुक्काम नाही तर… : रविंद्र शिसवे

शेठ हिराचंद मुथा महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

कल्याण

आनंद हा मुक्काम नाही तो प्रवास असतो. रस्त्याने चालताना शिक्षक डाव्या बाजूने चालावे हे शिकवतात. पण कोणत्या दिशेने हे तुमचे तुम्ही ठरवा. त्यात ज्ञान आणि शिक्षण उपयोगी पडते असे मत मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे यांनी व्यक्त केले. शेठ हिराचंद मुथा महाविद्यालय कल्याण यांच्या वार्षिक संमेलन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

या प्रसंगी कल्याण तहसीलदार जयराज देशमुख, मुथा महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रकाश मुथा, मुंबई विद्यापीठाच्या सदस्य डॉ. माधवी निकम, बीएनएन कॉलेज उपप्राचार्य सुधीर निकम, कमलादेवी कॉलेजचे अध्यक्ष सदानंद तिवारी, बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश जगताप, मुथा महाविद्यालयाच्या विश्वस्त अन्वेषा मुथा, मनीष मुथा, अविनाश मुथा, महाविद्यालय प्राचार्य अनुजा ब्रह्मा, मुथा स्कूल प्राचार्य सपना गदिया, माजी नगरसेवक अलका आवळस्कर, जयवंत भोईर यावेळी उपस्थित होते.

सध्या जीवनात व्हाटसप चे स्टेटस आणि आपले स्टेटस जास्त बघितले जाते. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांचे स्टेटस कसे वाढवतील याचा जास्त विचार करतो असे मत यावेळी अध्यक्ष प्रकाश मुथा यांनी व्यक्त केले. २०२३-२४ या संपूर्ण वर्षाचा अहवाल याप्रसंगी प्राचार्य अनुजा ब्रह्मा यांनी मांडला. महाविद्यालयाचा वार्षिक अंक,” क्षितिज” याचे प्रकाशन याप्रसंगी प्रमुख पाहुणे रवींद्र शिसवे यांच्या हस्ते करण्यात आले.

उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक , सांस्कृतिक,तसेच स्पोर्ट्स मधील प्रविण्याचा सत्कार करण्यात आला. रेट्रो ते मेट्रो अशी थीम असणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थीनी १९७० ते १९९० या दशकातील विविध गाण्यांवर नृत्य सादर केली आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली.