December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

सम्राट अशोक विद्यालयाचे वार्षिक विज्ञान प्रदर्शन संपन्न

कल्याण

पूर्वेतील पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचालित सम्राट अशोक इंग्रजी व मराठी माध्यम विद्यालयाचे वार्षिक विज्ञान, रांगोळी, हस्तकला, चित्रकला प्रदर्शनात इयत्ता १ ली ने १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्सुर्तपणे सहभाग घेउन आपली कला सादर केली. प्रदर्शनाचे उद्‌घाटन शास्त्रज्ञ अभय यावलकर आणि इंटरनॅशनल कुस्ती पटू वैष्णवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्‌घाटनाच्या प्रारंभी देशाचे माजी दिवंगत राष्ट्रपती तथा मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम तसेच क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करून आणि प्रतिकात्मक चांद्रयान आकाशात सोडून या महान व्यक्तींना अभिवादन करण्यात आले.

शास्त्रज्ञ अभय यावलकर यांनी वैज्ञानिक प्रकल्पांचे अवलोकन करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. उपस्थित विद्यार्थ्यांना वैद्यानिक प्रयोग करून दाखवत आपल्या दैनंदीन जिवनातही काही वैज्ञानिक गोष्टी नकळत घडत असतात हे प्रयोगातून दाखविले. प्रत्येक कृती आणि घटनेकडे वैद्यानिक दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे असे सांगितले.

 

दोन दिवस चाललेल्या प्रदर्शनास पालक विद्यार्थ्यांसह संस्थेच्या संचालिका गौतमी धनविजय, आमदार गणपत गायकवाड, उद्योगपती संजय गायकवाड, शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड,राष्ट्रीय विचार प्रबोधनीचे अध्यक्ष दिवाकर गोळपकर, आदर्श ह्यूमन राइट चे अध्यक्ष संजय शिर्के, राजेश अंकुश व मनीलाल शिंपी अशा प्रतिष्ठित मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

उपस्थित मान्यवरांचा परिचय माध्यमिक विभागाचे मुध्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी करून दिला तर उपस्थितांचा सन्मान आणि सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पी. टी. धनविजय यांनी केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गणेश पाटील यांनी केले. तर आभार संतोष कदम यांनी मानले. प्रदर्शनास विद्यार्थ्यांसह पालक वर्गाचा उत्सुर्त प्रतिसाद लाभला.