केडीएमसी क्षेत्रातील तिसऱ्या टप्प्यातील विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात
डोंबिवली
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात संपूर्ण देशात शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकार आणि सरकारच्या योजना पोहोचल्या पाहिजेत. त्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. विकसित भारत संकल्प यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यातील यात्रेचा शुभारंभ रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते डोंबिवलीतील भागशाळा मैदानात करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
शासनाच्या शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत प पोहोचायला हवा यासाठी या योजना केवळ कागदावर नसाव्यात या दृष्टिकोनातून ही विकसित संकल्प भारत यात्रा सुरू करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी हातात हात घालून काम केले तर या यात्रेच्या माध्यमातून अधिकाधिक लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळू शकेल असेही ते पुढे म्हणाले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, महापालिका उपायुक्त धैर्यशील जाधव, सहा. आयुक्त स्नेहा करपे, चंद्रकांत जगताप इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तदनंतर विकसित संकल्प भारत यात्रा शपथ उपस्थितांमार्फत ग्रहण करण्यात आली. रवींद्र चव्हाण यांनी लाभार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या विविध शासकीय योजनांच्या स्टॉल्सला भेटी देऊन उपस्थित लाभार्थ्यांशी संवाद साधला. आजच्या सकाळच्या सत्रात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात 335 लाभार्थ्यांनी विविध योजनांचा लाभ घेतला.
आणखी बातम्या
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न
पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ ॲक्टिव्ह