April 16, 2025

news on web

the news on web in leading news website

विद्यालयातील पालकांना हेल्मेट वाटप

वाहतूकीचे नियम, हेल्मेटची आवश्यकता याबाबत केली जनजागृती

कल्याण

कै. भाऊराव पोटे विद्यालयाने वाहतुकीचे नियम, वाहन चालवितांना घ्यावयाची काळजी, हेल्मेटची आवश्यकता याबाबत जनजागृती करीत विद्यार्थी व पालक यांना मोफत हेल्मेटचे वाटप करीत अभिनव उपक्रम राबविला.

दत्त कुपा एज्युकेशन ट्रस्ट संचालित कै. भाऊराव पोटे विद्यालयात विघार्थी पालक यांच्यासाठी अभिनव उपक्रम राबविले जातात. नुकताच शाळेच्या पटागंणात दत्त कुपा एज्युकेशन ट्रस्टचे सचिव बिपिन पोटे, संचलिका मिनल पोटे, सेवा सहयोगी फाऊंडेशनचे सदस्य विजय बारवे, आर.टी.ओ. कार्यालय कल्याण वरिष्ठ निरिक्षक रोहित पवार, आर.टी.ओ. अधिकारी विनायक गुंजाळ, प्रा. विभाग मुख्याध्यापक संजय घुले, माध्यमिक विभाग मुख्याध्यापक सुरेश वामन, शिक्षिका कमल लाडंगे, रंजना भांगरे आदी शिक्षक वर्ग याप्रसंगी उपस्थित होता.

याप्रसंगी आर.टी.ओ कल्याण वरिष्ठ निरिक्षक रोहित पवार यांनी पालक आणि विघार्थीना वाहतुकीचे नियम, वाहन चालवितांना घ्यावयाची खबरदारी, हेल्मेटची आवश्यकता आणि सुरक्षित प्रवासाचे गमक इत्यादी बाबी बद्दल माहिती दिली. सुरक्षित दुचाकी प्रवास हाच या कार्यक्रमाचा हेतू होता. बिपिन पोटे यांनी “राईट टु सेफ्टी” या विषयातर्गत गोष्टी रूपाने विघार्थीना सांगितले की, डॉक्टर आपले देवदूत होतात. तसे दुचाकीवरून प्रवास करतांना हेल्मेट आपले देवदूत आहे. देणार्यांने देत जावे घेणार्यांनी घेत जावे असे असेल तरीही घेणाऱ्या नी सुद्धा कधीतरी दिले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

सेवा सहयोगी फाऊंडेशनचे सदस्य विनय बारवे यांनी विद्यार्थी आणि पालक या दोघांनी ही हेल्मेट का घालवे त्याचे महत्त्व सांगितले. जेव्हा पालक विद्यार्थ्यांना दुचाकीवर घेऊन प्रवास करतात तेव्हा पालक आणि विद्यार्थी या दोघांचीही सुरक्षा महत्त्वाचे असते. म्हणून आमच्या संस्थेमार्फत दोन हेल्मेट दिले जातात. कार्यक्रमचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक संजय घुले, शिक्षिका रंजना भांगरे यांनी केले.