December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

निवासी शिबिर संपन्न

कल्याण

शहाड येथील मातोश्री वेलबाई देवजी हरिया वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय निवासी शिबिराचे अंबरनाथ तालुक्यातील मौजे ब्राह्मण करवले येथे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांतर्गत पर्यावरण जनजागृती, ग्राम स्वच्छता, कापडी पिशव्यांचे वाटप, ‘मेरी माटी, मेरा देश’ या अंतर्गत मोदक सीड्सचे वाटप, नवीन मतदार नाव नोंदणी यासारखे उपक्रम राबवण्यात आले. या शिबिराचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. कविता मांजे व प्रा. संजय झुगरे यांनी केले. शिबिर आयोजनासाठी महाविद्यालयाचे संचालक मंडळ, प्राचार्य, उपप्राचार्य यांच्यासह प्राध्यापकांचे मोलाचे सहकार्य लाभले.