December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

वरिष्ठ राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धा संपन्न

ठाणे

महाराष्ट्र राज्य बॉल बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आयोजित ६७ व्या वरिष्ठ राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत ठाणे जिल्हा संघाने द्वितीय स्थान प्राप्त केले. हिंगोली येथील वसमत येथे ही स्पर्धा नुकतीच संपन्न झाली.

या स्पर्धेत ठाणे जिल्हा संघाने गटात नवी मुंबई, पुणे महानगर संघाला नमवले तर मुंबई संघाबरोबर संघाला हार पत्करावी लागली. उपांत्यपूर्व सामन्यात ठाणे जिल्हा संघाने चंद्रपूर संघाला नमवत उपांत्य फेरी गाठली. तिथे हिंगोली संघाचा अटीतटीच्या सामन्यात ठाणे संघाने पराभव करत थेट अंतिम फेरी गाठली. पुणे महानगर संघासोबत तीन सेटच्या सामन्यात ठाणे संघाचा पराभव झाला. त्यांना द्वितीय स्थान प्राप्त झाले.

ठाणे जिल्हा संघात कर्णधार सचिन राठोड, केतन इंदुलकर, पियुष झेंडे, किरण शेट्टी, रविंद्र आवार, भूषण राजेशिर्के, रोहित यादव, मंगेश तिवारी, जितेश गायकवाड, रिषभ सावंत यांचा समावेश होता. ठाणे जिल्हा संघ व्यवस्थापक म्हणून अविनाश पाटील तर मार्गदर्शक म्हणुन निशांत पेंढारकर यांनी काम पाहिले. ठाणे जिल्ह्यात बॉल बॅडमिंटन खेळांच्या प्रचार आणि प्रसार करण्यासाठी यापुढेही जिल्हा संघटना कार्यरत राहील असे जिल्हा संघटनेचे सचिव प्रा. श्रीराम पवार यांनी सांगितले.