December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

अनुलोपचा वैद्यकीय कक्ष सज्ज

कल्याण

श्रीमलंगडच्या पायथ्याशी उसाटने गावच्या विस्तीर्ण परिसरात होत असलेल्या राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहात अनुलोम कल्याण उपविभाग मार्फत राहुल चौधरी फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत वैद्यकीय सेवा शिबीराचे आयोजन केले आहे. डॉक्टर आणि सहाय्यकांची ही टीम भक्तांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे.

श्रीमलंग मच्छिंद्रनाथ, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, प्रेममूर्ती नामदेव महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज अशी अनेक सुसज्ज दालने लाखो हरि हर भक्ताना सामावून घेण्यासाठी सज्ज आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणारा अखंड हरिनाम सप्ताह ९ जानेवारी २०२३ पर्यंत सुरू राहणार असून भाविक भक्तांनी या हरिनाम सप्ताहात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. रिंगण सोहळा, नामवंत कीर्तनकार यांची कीर्तने, पारायण अशी अनेक आकर्षणे या सोहळ्यात असून भागवतधर्म संप्रदाय प्रसारक मंडळ, ठाणे रायगड जिल्ह्या वारकरी मंडळाला या राज्यस्तरीय सप्ताहाचे यजमान होण्याचा मान मिळाला आहे. सदर शिबिरात अनुलोम या राज्यस्तरीय सामाजिक संस्थेच्या कल्याण उपविभागा मार्फत डोंबिवलीतील डॉ राहुल चौधरी आणि त्यांच्या सेवाभावी टीमच्या सहयोगाने मोफत आरोग्य सेवा देण्याचे काम सुरू आहे. दररोज नवनवीन डॉकटर या शिबिरात सहभागी होतील. मोफत तपासणी,मोफत इसिजी, वैद्यकीय सल्ला आणि औषधे देण्यात येत असून कास्य थाळी फुट मसाज, फिजिओ थेरपी सुद्धा देण्यात येत आहे. अजूनही बऱ्याच वैद्यकीय सेवा येत्या दिवसात समाविष्ट होणार आहेत. भाविक भक्तांनी सप्ताहात आल्यावर या सेवेचा सुद्धा लाभ घ्यावा तसेच सदिच्छा भेट द्यावी असे आवाहन अनुलोम आणि आरसी फाऊंडेशन मार्फत करण्यात आले आहे.