April 16, 2025

news on web

the news on web in leading news website

पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत एसएसटीच्या विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी

कल्याण

मुंबई विद्यापीठ, ठाणे स्पोर्ट्स कमिटी आणि जीवनदीप महाविद्यालय गोवेली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत एसएसटी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत एक सुवर्ण आणि एक कांस्यपदकाची कमाई केली.

विद्यापीठातर्फे आयोजित केल्या गेलेल्या या स्पर्धांमध्ये ठाणे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांनी आपला सहभाग नोंदविला. यामध्ये मुलींच्या गटात एसएसटी महाविद्यालयाच्या प्रांजली पगारे हिने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तर भूमिका कोळसे हिने कांस्यपदकाची कमाई केली. या विजयी खेळाडूंची निवड विभागीय स्पर्धांसाठी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. आपल्या यशाचे श्रेय खेळाडूंनी महाविद्यालय आणि क्रीडा शिक्षकांना दिले.