December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

अन्, पोलिस बनले शिक्षक

कल्याण

कोळसेवाडी पोलीस ठाण्यात शाळा भरविण्यात आली. पोलिसांचे काम, पोलिसांकडे असलेली हत्यारे, याची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली. पोलीस रेझिंग सप्ताह 2024 अंतर्गत आज आयडियल इंग्लिश हायस्कूल, मातोश्री रखमाबाई गायकवाड विद्यालय, द्वारका विद्यालयातील ७५ विद्यार्थी सहभागी झाले होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला. त्यास विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस, नागरिकांची भूमिका किती महत्त्वाची असते. सामान्य नागरिकाला पोलीस ठाण्यात येण्यास भीती वाटू नये, शाळकरी मुले मोठी झाल्यानंतर निर्भयपणे त्यांनी पोलीस ठाण्यात यावे, ही अपेक्षा आहे.

पोलिसांच्या कामाचे स्वरूप मुलांना समजावे, पिस्तुल भरपूर वजनाचे असते. रायफल दिसताना चांगली दिसते, ती चालविण्यासाठी पोलिसांना कष्ट उचलावे लागतात, याचीही माहिती मुलांना मिळावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

उपस्थित विद्यार्थ्यांना एस. एल. आर. पिस्तुल, एनएमएन कारवाईला ३००३ रायफल, हेल्मेट, लाठी लॉकअप याबाबतची माहिती एपीआय मल्लिनाथ डोके यांनी दिली.