December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

व्हॉईस ऑफ मीडियाच्यावतीने रुग्णालयात फळे वाटप

कल्याण

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त ६ जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्यात येतो. पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला व्हाईस आँफ मिडिया पत्रकार संघटनेच्या कल्याण तालुक्याच्या वतीने केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.

महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो. बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पत्रकार आहेत. त्यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते.

याच पत्रकार दिनाचे औचित्य साधून व्हॉईस ऑफ मीडिया कल्याण तालुक्याच्या वतीने रुग्णांना फळे वाटप करत लवकरात लवकर बरे होत चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी रुक्मिणी बाई रुग्णालयाचे मुख्य आरोग्य अधिकारी पुरुषोत्तम टिके, व्हाईस आँफ मिडिया कल्याण तालुका अध्यक्ष जगदीश खंबाळे, सचिव कुणाल म्हात्रे, कोषाध्यक्ष राजु काऊतकर, सह कोषाध्यक्ष सचीन मांजरे, कार्याध्यक्ष अशोक कांबळे, तालुका संघटक जितेंद्र सैतवाल, सहसंघटक विलास भोईर, प्रथमेश कांबळे, सल्लागार मनोज ताठे, सदस्य संजय कांबळे आदी पत्रकार उपस्थित होते.