December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

पत्रकारांची केली आरोग्य तपासणी

केडीएमसी व फोर्टीस रुग्‍णालय यांच्या संयुक्त विदयमाने आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन 

कल्याण

केडीएमसीच्या स्थायी समिती सभागृहात पत्रकार दिन उत्साहात संपन्न झाला. पत्रकार दिनाचे औचित्य साधून या दिवशी कल्याण डोंबिवली महानगरपलिका व फोर्टीस रुग्‍णालय, कल्याण यांच्या संयुक्त विदयमाने आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यासमयी महापालिका परिमंडळ -1 चे उपायुक्त प्रसाद बोरकर, जेष्ठ पत्रकार मिलिंद बेल्हे, महापालिकेचे उपसचिव किशोर शेळके, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे तसेच कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अनेक पत्रकार उपस्थित होते.

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, लोकशाहीच्या इतर तीन स्तंभावर अंकुश ठेवण्याचे मोलाचे काम पत्रकारांमार्फत केले जाते, असे उद़गार महापालिकेचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी आपल्या भाषणात काढले आणि पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

आर्टीफिशियल इंन्टिलीजन्समुळे पत्रकारांना नवनविन आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सर्वांनी स्वत:साठी थोडा वेळ काढणे गरजेचे आहे तसेच रुटिन चेकअप करणे देखील गरजेचे आहे असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार मिलिंद बेल्हे यांनी आपल्या भाषणात केले. यावेळी फोर्टीस रुग्‍णालयातील प्रख्यात युरॉलॉजिस्ट डॉ. प्रदीप व्यवहारे यांनी चित्रफितीच्या माध्यमातून उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले.

यासमयी फोर्टीस रुग्‍णालयाच्या वतीने उपस्थित पत्रकारांच्या रक्तदाब, बॉडी मास इंडेक्स, डोळयांची तपासणी, बोन मिनरल डेन्सिटी (बीएमडी) इ.आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. या आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ अनेक पत्रकारांनी घेतला.