December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

रक्तदान शिबिरात १८८ जणांचे रक्तदान

शिवसेनेच्या उंबर्डे – कोळीवली विभागीय शाखेतर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद 

कल्याण

कल्याण पश्चिमेतील आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने शिवसेनेच्या उंबर्डे – कोळीवली विभागीय शाखेतर्फे यंदाही प्रभाग क्र. 1 आणि 2 मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान सोहळ्याचे यंदाचे हे 28 वे वर्ष असून 188 रक्तदात्यांनी या शिबिरामध्ये रक्तदान केले.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने, गुरूवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संसदरत्न पुरस्कार प्राप्त खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारणाच्या तत्वावर विश्वास ठेवून आपण काम करत असल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले.

तर शिवसेना विभागीय शाखेतर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. एक सामाजिक बांधिलकी म्हणून गेल्या सव्वा दोन दशकांहून अधिक काळापासून हे रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे. गेल्या 27 वर्षांपासून रक्तदानाचा हा यज्ञ अखंडपणे सुरू ठेवणारी ही शिवसेनेची ही कल्याणातील एकमेव शाखा असून याचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याचेही आमदार भोईर म्हणाले.