December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

कल्याणमध्ये विचार उत्सव साजरा

कल्याण

राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्री, फातिमा शेख यांच्या जयंती निमित्ताने विचार उत्सव व समता संघर्ष संघटनेची शाखा समता संघर्ष सांस्कृतिक मंच उद्घाटन सोहळा मोठया उत्साहात आचार्य अत्रे, कॉन्फरन्स हॉल कल्याण येथे साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेश सोष्टे होते. तर कार्यक्रमाचे प्रास्तविक शैलेश दोंदे यांनी मांडले. प्रमुख वक्त्या म्हणून साधना भेरे यांनी आपले विचार व्यक्त करत असताना राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवत असताना स्वराज्याचे स्वप्न कसे पुर्णत्वास नेले व सावित्रीबाई फुले यांनी जोतिबांना स्त्री शिक्षणाची मुळे रोविण्याकरिता कसे सहकार्य केले तसेच जिजाऊ सावित्री सांस्कृतिक विचार विचार वारसा याबद्दल मार्गदर्शन केले. तर प्रा. अश्विनी शिरसाट यांची मुलाखत सुरेखा पैठणे व रोहित जाधव यांनी घेतली.

यावेळी प्रा. अश्विनी शिरसाठ यांनी आपले विचार मांडताना राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई फुले आणि फातिमा शेख यांना तत्कालीन अडचणींना संघर्ष करत कसे सामोरे जावे लागले आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्य वैश्विक रित्या किती महत्त्वाचे आहे हे पटवून दिले. विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील काम करत असलेले नारायण भालेराव, दिपक टिके, दैवशाला गिरी, डॉ. कविता वरे, आशा तिरपुडे, प्रमोद जाधव, साधना भेरे, प्रा. अश्विनी शिरसाठ, नरेंद्र राऊत, चंद्रलेखा गायकवाड यांना समता संघर्ष सांस्कृतिक मंचच्या वतीने विशेष सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले.