कल्याण
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून आधारवाडी येथील रोहिणी धोंडू हटकर (६९) यांचे त्यांच्या इच्छेनुसार मरणोत्तर देहदान करण्यात आले. संस्थानच्या पुढाकारातून झालेले हे ५२ वे देहदान आहे. रोहिणी हटकर यांचा मृतदेह नवी मुंबई येथील महात्मा गांधी हॉस्पिटल येथे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी रोहिणी यांचा मुलगा संतोष, सुनील, अनिल, मुलगी वर्षा सातपुते तसेच त्यांच्या सुना, जावई आणि नातवंडे यांच्यासह स्व-स्वरूप संप्रदायाचे शिवाजी करकरे-जिल्हा व्यवस्थापक नवी मुंबई व ठाणे शहर राजेश पोटे दक्षिण ठाणे जिल्हा अध्यक्ष, विष्णू कदम प्रोटोकॉल अधिकारी, मिलिंद नावले प्रोटोकॉल अधिकारी, अशोक पेडणेकर माजी जिल्हा अध्यक्ष, संदीप वीर कल्याण पश्चिम तालुका प्रमुख, विनायक दळवी, वसंत सालदुर, दिपक पगारे, प्रतीत ठवाल, अमित पारधी आदी उपस्थित होते. महात्मा गांधी हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर व सर्व कर्मचारी यांचे यावेळी सहकार्य लाभले.
जगद्गुरूश्रींनी त्यांच्या संप्रदायाला मृत्यूनंतरही देहदान करून समाजाच्या उपयोगी पडण्याचे आवाहन केले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. तसे अर्ज भरून संस्थांनकडे दिले. त्यांनी ते संबंधित वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द केले आहेत. त्यातील ५२ जणांनी आत्तापर्यंत मरणोत्तर देहदान केले आहे. गुरूंवरील निष्ठा आणि गुरुंवरील प्रेम यामुळेच जगद्गुरुश्रींचे अनुयायी मरणोत्तर देहदान करत आहेत.
आईने मरणोत्तर देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार देहदान करण्यात आल्याचे रोहिणी यांचा मुलगा संतोष यांनी सांगितले.
आणखी बातम्या
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न
पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ ॲक्टिव्ह