December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

पत्रकार स्वदेश मालवीय

पत्रकार स्वदेश मालवीय यांचे निधन

मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

कल्याण

कल्याण डोंबिवली शहरातील ज्येष्ठ पत्रकार स्वदेश मालवीय यांचे मुंबईतील केईएम रुग्णालयात निधन झाले. उपचारादम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रेन हॅम्ब्रेज झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात शस्रक्रिया करण्यात आली होती. मालवीय यांनी गेली ३५ वर्ष पत्रकारिता केली. महाविद्यालयीन शिक्षण घेताच त्यांनी पत्रकारिता सुरु केली होती. सुरुवातीच्या काळात हिंदीतील ‘जनसत्ता’ या वृत्तपत्रात त्यांनी बरीच वर्षे काम केले.

मालवीय यांनी एनडीटीव्हीचे प्रतिनिधी म्हणून कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, ठाणे या भागाकरीता काम पाहिले. त्यानंतर त्यांनी स्वत:चे ‘डेली टच’ हे वेब पोर्टल सुरु केले होते. याशिवाय ते पीटीआय डिजिटलसाठी काम करीत होते. त्यांना रक्तदाबाचा त्रास होता. तीन दिवसापूर्वी रात्री त्यांचा रक्तदाब अचानक वाढला. त्यांना मध्यरात्रीच केडीएमसीच्या कल्याण येथील रुक्मीणीबाई रुग्णालयात नेले. त्यावेळी तिथे आयसीयूची सुविधा नसल्यामुळे त्यांना कळवा अथवा मुंबईला नेण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादम्यान शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले, भाऊ, बहिण असा परिवार आहे.