कल्याण
केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पहिला ठाणे जिल्हा क्रीडा महोत्सव सांगता सोहळा दादासाहेब गायकवाड क्रीडांगण येथे मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. क्रीडा महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी आट्यापाट्या खेळाच्या स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाल्या. कल्याण, ठाणे, शहापूर, अंबरनाथ येथील २६ संघांनी सहभाग घेतला.
सांगता सोहळ्यासाठी निलेश शिंदे (माजी नगरसेवक), विक्रांत शिंदे (उद्योजक), सुरेश काळे, अनिल करपे, मनोज नायर, सुरेश बोरसे (मुख्याध्यापक, महात्मा गांधी विद्यामंदिर, डोंबिवली), पद्माकर फर्डे (मुख्याध्यापक, अभिनव इंग्लिश स्कूल, आसनगाव), संजय काळे (आयोजन सचिव), सुप्रिया नाईकर (प्राचार्या, ग्लोबल कॉलेज, डोंबिवली), प्रा . लक्ष्मण इंगळे (अध्यक्ष, कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळ), रेणूका पिसे, लता पाचपोर, शोभा कर्वे, शेखर शिंदे (सदस्य, ठाणे जिल्हा आर्चरी असोसिएशन,) प्रविण खाडे (सचिव, कल्याण डोंबिवली लंगडी असोसिएशन) आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी वाशी इंग्लिश स्कूलचे क्रीडा शिक्षक व आट्या पाट्या राष्ट्रीय खेळाडू अनिल घुगे या़ची महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागात क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल निलेश शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. आट्या पाट्या राज्य खेळाडू अमोल महाडिक यांची भारतीय सैन्य दलात नेमणूक झाल्याबद्दल त्या़चाही गौरव करण्यात आला. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेले अथर्व मांडवकर, प्राची निवाते, सिनीयर राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेले अनुराधा मोरे यांचा सत्कार विक्रांत शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
पहिल्या ठाणे जिल्हा क्रीडा महोत्सवात कबड्डी, खो-खो, आट्या पाट्या, टेनिस बॉल, क्रिकेट, टेनिक्वाईट, लंगडी, धनुर्विद्या, कॅरम, बुद्धिबळ, तलवारबाजी या खेळांच्या स्पर्धांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. ठाणे जिल्ह्यातील विविध शाळांनी स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिला.
सांगता सोहळ्याप्रसंगी सचिव संजय काळे यांनी ठाणे जिल्हा क्रीडा महोत्सवाचा थोडक्यात आढावा सांगून हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व एकविध क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी, खेळ प्रमुख शिक्षक, क्रीडा शिक्षक व स्वयंसेवकांनी खूप कष्ट घेतले त्याबद्दल कौतुक केले. त्यानंतर प्रविण खाडे, लक्ष्मण इंगळे, अनिल शेजवळ या खेळ प्रमुखांनी स्पर्धा आयोजनातील अनुभव सांगितला. ठाणे जिल्हा क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी विविध समिती प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. आट्या पाट्या राष्ट्रीय खेळाडू व वाशी इंग्लिश स्कूलचे क्रीडा शिक्षक अनिल घुगे यांची महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल निलेश शिंदे यांनी सत्कार केला.
पुढील वर्षी होणाऱ्या दुसरा ठाणे जिल्हा क्रीडा महोत्सवात आणखी नवनवीन खेळांचा समावेश करण्यात येईल, असे निलेश शिंदे यांनी घोषित केले. खेळातून चारित्र्य घडते, चारित्र्यातून उत्तम समाज घडतो आणि उत्तम समाजातून उत्तम राष्ट्र घडते, असे विक्रांत शिंदे यांनी सांगून खेळाडू व क्रीडा शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला.
ठाणे जिल्हा क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी महादेव क्षीरसागर (आयोजन खजिनदार), अविनाश नलावडे (आट्यापाट्या खेळ प्रमुख), उमाकांत चौधरी, मुकुंद गायधनी, राजेश मानवडे, सुभाष मते, सुभाष गायकवाड, किरण तळेले, समीर भोईर, रेणूका पिसे, लता पाचपोर, जय जिजाऊ स्पोर्ट्स अकॅडमीच्या राष्ट्रीय खेळाडू सपना यादव, पूनम पार्टे व अन्य खेळाडू स्वयंसेवक, तसेच ठाणे जिल्हा आट्या पाट्या असोसिएशनचे खेळाडू स्वयंसेवक यांनी विशेष मेहनत घेतली.
आट्या पाट्या स्पर्धेचा अंतिम निकाल –
आट्या पाट्या (मुले)
प्रथम – मातोश्री रखमाबाई गायकवाड विद्यालय, कल्याण पूर्व
द्वितीय – आरंभ स्पोर्ट्स क्लब, कल्याण पूर्व
तृतीय – भारतीय सैनिकी विद्यालय, खडवली
सर्वोत्कृष्ट आक्रमक – समर्थ पाटील, आरंभ स्पोर्ट्स क्लब
सर्वोत्कृष्ट संरक्षक – अतुल राठोड, मातोश्री रखमाबाई गायकवाड विद्यालय, कल्याण पूर्व
सर्वोत्कृष्ट सूर – आर्यन कदम, आरंभ स्पोर्ट्स क्लब
–
आट्यापाट्या (मुली)
प्रथम – अभिनव स्पोर्ट्स अकॅडमी, आसनगाव
द्वितीय – मातोश्री स्पोर्ट्स क्लब, कल्याण पूर्व
तृतीय – मातोश्री रखमाबाई गायकवाड विद्यालय, कल्याण पूर्व
सर्वोत्कृष्ट आक्रमक – वेदिका वायले, अभिनव स्पोर्ट्स अकॅडमी, आसनगाव
सर्वोत्कृष्ट संरक्षक – अस्मिता सारुक्ते, अभिनव स्पोर्ट्स क्लब
सर्वोत्कृष्ट सूर – आर्या म्हात्रे – मातोश्री रखमाबाई गायकवाड विद्यालय, कल्याण पूर्व
आणखी बातम्या
रविवारी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम
कुणबी, मराठा समाजातील युवती व महिलांसाठी मोफत प्रशिक्षण
केडीएमसीसाठी कुशीवली धरण आरक्षित करा : आमदार भोईर