December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

ठाणे ग्रामीण संघाला सुवर्ण मुकुट

वासिंद

जिल्हा क्रीडा संकुल, मरारतोली गोंदिया जिल्हा येथे 2 ते 4 फेब्रुवारी रोजी आयोजित 11 वी किशोर व कुमार गटात ठाणे जिल्हा ग्रामीण संघाकडून खेळताना न्यू आयडियल स्कुल आणि ज्यु कॉलेज, वासिंदच्या विद्यार्थ्यांनी किशोर गटात आपले वर्चस्व राखत अंतिम सामन्यात गोंदिया जिल्हा संघाला एक हाती हरवत सुवर्ण पदक मिळवले. संघाकडून खेळताना सार्थक बडे, जय चंदे, वंश मिश्रा, कुणाल रसाळ, यांनी आक्रमक तसेच आयुष सिंग, वेदांत काबाडी याने बचावत्मक खेळ करत संघाला सुवर्णपदक मिळवून दिले.

सार्थक बडे याला स्टार ऑफ महाराष्ट्र खिताबाने सन्मानित करण्यात आले. संघांचे प्रशिक्षक व क्रीडा शिक्षक संदीप नरवाडे व व्यवस्थापक अरुण निचिते यांनी मार्गदर्शन केले. तसेच कुमार गटात ग्रामीण संघ चौथ्या क्रमांकावर राहिला. तिसऱ्या क्रमांकासाठी खेळवण्यात आलेल्या सामन्यात वर्धा जिल्ह्याने निसटता विजय मिळवला. न्यू आयडियल स्कुल आणि ज्यु कॉलेज चे मुख्याध्यापक अरुण भोईर, उपमुख्याध्यापिका नीलम व संपूर्ण शिक्षकवृंद यांनी विजेत्या संघांचे व महाराष्ट्र संघात निवड झालेल्या खेळाडूंचे कौतुक करत एप्रिल मध्ये जालंदर, पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.