बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्थेच्या वतीने जिजाऊ, सावित्री, रमाई यांची संयुक्त जयंती साजरी
कल्याण
कल्याण डोंबिवली महानगरपालिका बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था आयोजित राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आणि त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव आणि संस्थेचा अठरावा वर्धापन दिनानिमित्त आचार्य अत्रे रंगमंदिर कॉन्फरन्स हॉल या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विचार मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी महापौर रमेश जाधव, उद्घाटक अर्चना दिवे उपायुक्त, दीपक पाटील अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत विभाग कल्याण, विशेष अतिथी दत्ता गिरी अध्यक्ष मागासवर्गीय संघटना तर प्रमुख वक्त्या जया बनसोडे, संस्थाध्यक्ष चंद्रकांत पोळ, जयंती समिती अध्यक्ष नागेश टोळ, कल्पना खरात आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यापुढे म्हणाल्या की, राष्ट्रीय महापुरुष यांना आपल्यावर वेळ पडल्यावरच बुलेट फ्रुप जॅकेट म्हणून आज आपण त्यांचा वापर करू लागलो आहोत. परंतु त्यांचे विचार आत्मसात करणे ही आज गरज आहे. तसेच राष्ट्रीय महापुरुषांनी कधीच जातीभेद केला नसून त्यांचे कार्य जातीच्या ही पलीकडे आहे म्हणूनच ते राष्ट्रीय महापुरुष झाले आहेत. आज प्रत्येक माणूस आपापल्या जाती चष्म्यातून एकमेकाकडे पाहातो आहे परंतु मानव ही जात आणि माणुसकी हाच धर्म असा प्रत्येकाने विचार केला तरच देशात क्रांती घडू शकेल. राष्ट्रीय महापुरुष कसे जगले आणि त्यांनी आपला त्याग कसा केला याचाही विचार प्रत्येकाने केला पाहिजे. प्रमुख वक्त्या म्हणून त्यांनी उत्कृष्ट असे मार्गदर्शन केलं.
तर दुसऱ्या सत्रामध्ये प्रकट मुलाखत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मुलाखतकार संपादिका पत्रकार नीलम चौधरी यांनी आमच्या जीवनातील आदर्श माता या विषयावर सामाजिक कार्यकर्त्या कल्पना खरात, माया कांबळे, डॉ. दिपाली मोरे साबळे, सुमन टोळ यांची मुलाखत घेतली. या कार्यक्रमासाठी उत्तम गायकवाड, संतोष हेरोडे, भूषण कोकणे, बाबासाहेब काकडे, नवनीत गायकवाड, भाऊराव पंडित, संदीप गिरी, पूर्णिमा कांबळे, युगा नलावडे यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच उप समित्या सर्व महापालिका अधिकारी कर्मचारी वर्ग आणि सदस्य यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन समाधान मोरे यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार प्रदर्शन भूषण कोकणे यांनी केले.
आणखी बातम्या
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न
पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ ॲक्टिव्ह