December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

समाज माध्यमांची भूमिका

कल्याण

ठाणे, मुंबई, नवी मुंबई ,रायगड पालघर, नाशिक,बीड इथून आलेल्या संस्थांचा आज कल्याण पूर्व मध्ये प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

सोशल मीडियाचा वापर समाजासाठी कसा करावा तसेच समाज माध्यमांचा वापर करून समाजसेवी संघटना निधी कशाप्रकारे जमा करता येईल यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

मार्गदर्शक वक्ते सौरभ शशी कुमार व आशिष सिंग असून दोघेही नरसी मोहनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे मॅनेजमेंटचे विद्यार्थी आहेत.

महाविद्यालयाकडून त्यांना स्टडी वेळी संस्थेत 25 दिवसांसाठी समाजकारण करण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्यांनी अध्ययन करून पीपीटी तयार करण्यासाठी संस्थेकडून मार्गदर्शन करण्यात आले सोशल माध्यमांद्वारे कार्यक्रमाची माहिती समाजात पोहोचवण्यात आली त्यानंतर 29 संस्थांनी मोफत ऑनलाईन नोंदणी केली. व त्यातील 21 संस्थांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यशाळेचा लाभ घेतला.