December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

अहमदनगरमध्ये निर्भय बनो सभा संपन्न

अनिल लष्कर

अहमदनगर

अहमदनगर लोकशाही बचाव मंच आयोजित ‘निर्भय बनो’ सभेचे आयोजन सावेडी येथील माऊली सभागृह येथे करण्यात आले होते.

यासभेसाठी प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे होते. तर अध्यक्षस्थान माजी कुलगुरू सर्जेराव निमसे यांनी भूषविले. अहमदनगर लोकशाही बचाव मंच यांच्या प्रयत्नामुळे संपूर्ण सभागृह भरले होते. सभागृहाच्या बाहेर एलइडी स्क्रीन लाऊन नागरिकांनी हा संपूर्ण कार्यक्रम पाहिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ. बापू चंदनशिवे उत्तम पद्धतीने केले.

हा कार्यक्रम किरण काळे, सुजित क्षेत्रे, अनिस चुडीवाला व अहमदनगर लोकशाही बचाव मंच यांनी यशस्वी केला.