ठाणे-डोंबिवली-कल्याणसह बृहन्मुंबईत व्यापक आयोजन
निरंकारी मिशन मार्फत ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत आयोजन
ठाणे
संत निरंकारी मिशनमार्फत प्रोजेक्ट अमृत अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ परियोजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे आयोजन रविवार, दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात यमुना छठ घाट, आई. टी. ओ. दिल्ली येथून करण्यात येत आहे.
संत निरंकारी मंडळाचे सचिव तथा समाज कल्याण विभागाचे प्रभारी जोगिन्दर सुखीजा यांनी या विषयी माहिती देताना सांगितले, की ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या आदर्श घोषवाक्यातून प्रेरणा घेत ही परियोजना अवघ्या भारतवर्षात जवळपास1500 पेक्षा अधिक ठिकाणी 27 राज्यें व केंद्र शासित प्रदेशांतील 900 शहरांमध्ये एकाच वेळी राबविली जाणार आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश जलसाठे सुरक्षित ठेवण्याच्या विकल्पांबाबत जनसामान्यांना जागृत करुन येणाऱ्या पिढ्यांचे भवितव्य स्वस्थ करणे हा आहे.
ठाणे जिल्ह्यात ठाणे शहर, नवी मुंबई, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, बदलापुर इत्यादि ठिकाणांच्या व्यतिरिक्त मुंबई महानगर प्रदेशात जवळपास 100 ठिकाणी व्यापक स्वरुपात ही परियोजना राबविण्यात येत असून त्यामध्ये हजारोंच्या संख्येने निरंकारी सेवादल स्वयंसेवक, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे सदस्य व अन्य निरंकारी श्रद्धालु भक्त आपल्या निष्काम सेवा समर्पित करतील.
बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या प्रेरणादायी शिकवणूकीचे अनुसरण करत संत निरंकारी मिशन मार्फत स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहयोगाने ‘प्रोजेक्ट अमृत’चा शुभारंभ वर्ष 2023 मध्ये केला आहे. या परियोजनेचा मुख्य उद्देश जलसाठ्यांचे संरक्षण, त्यांची स्वच्छता व जनसामान्यांमध्ये याविषयी ‘जागरूकता अभियान’ राबवून त्यांना प्रोत्साहित करणे हा असून या परियोजने अंतर्गत संपूर्ण भारतातील विविध ठिकाणचे समुद्र किनारे, नद्या, सरोवरे, तलाव, विहिरी, झरे इत्यादी जल संसाधनांची स्वच्छता केली जाणार आहे.
संत निरंकारी मिशनमार्फत सातत्याने राबविण्यात येत असलेल्या वृक्षारोपण, रक्तदान अभियान, स्वच्छता अभियान, तलासरी बांध परियोजना, वननेस वन (नागरी वृक्ष समूह) यांसारख्या कल्याणकारी योजना नि:संशयपणे पर्यावरण संरक्षण करत धरतीला सुंदर करण्याच्या दृष्टीने अत्यंत प्रशंसनीय व स्तुत्य पाऊल आहे.
आणखी बातम्या
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न
पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ ॲक्टिव्ह