December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

भूतबाधेच्या नावाखाली अघोरी उपचार

जादूटोणाविरोधी कायदा लागू करण्याची

अ.भा.अंधश्रध्दा निर्मूलन समितीची मागणी

ठाणे

सावरकर नगर येथे अघोरी पद्धतीने भूत बाधा उतरविणार्‍या महिलेच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याबाबत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे शाखेच्या वतीने वर्तक नगर पोलिस स्टेशन मध्ये निवेदन देण्यात आले.

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थानिक शाखा ठाणे, यांच्याकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार सायली संतोष भोसले कार्यालय वास्तु ओंकार विसावा सोसायटी प्लॉट नंबर ७५, सी- ३, म्हाडा वसाहत, सावरकर नगर ठाणे, वरील पत्त्यावर कार्यालय चालवत आहेत. या संदर्भात समितीकडे व्हिडीओसह तोंडी तक्रारी प्राप्त झाल्या. हि महिला तिच्या कार्यालयात जादूटोणा, अघोरी विद्या, भूत, करणी, मूठ असे प्रकार करत असल्याचे समितीने पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

चमत्कारांचा दावा करून आर्थिक प्राप्ती करणे, प्रचार प्रसार करुन लोकांना फसविणे. अंगात अतिंद्रीय शक्ती संचारली असल्याचे भासवून इतरांच्या मनात भिती निर्माण करणे. हे जादूटोणाविरोधी कायदा 2013 (महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, 2013) नुसार गून्हा आहे. तसेच चमत्कारिक पद्धतीने रोग मुक्तीचा दावा करणे ड्रग्स अँन्ड मॅजिक रेमिडीज अक्ट 1954 नुसार गून्हा आहे. पोलिसांनी सदर प्रकरणाची गंभीरपणे चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शिष्टमंडळात अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रविंद्र खानविलकर, महाराष्ट्र राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे, ठाणे जिल्हा अध्यक्ष डॉ. प्रकाश ढोकणे, महिला संघटिका नीता डुबे, कोषाध्यक्ष रविंद्र रहाटे, कायदेशीर सल्लागार वैष्णवी पिंपरिकर, सदस्य वामन गार्डे हे उपस्थित होते.