The Web Cloud Media

the news on web in leading news website in maharashtra

मोर्चाने कल्याण मनसेला मिळाली नवसंजीवनी

मनसेने दिली केडीएमसी मुख्यालयावर धडक

कल्याण

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध प्रश्नाविषयी केडीएमसी मुख्यालयावर मनसेचा मोर्चा धडकला. पश्चिमेतील मोहिंदरसिंग काबूलसिंग हायस्कूलहून निघालेला हा मोर्चा टिळकचौक मार्गे महापालिका मुख्यालयावर आला.

मोर्चामध्ये केडीएमसी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मनसेच्या शिष्टमंडळाने केडीएमसी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची भेट घेत आपल्या मागण्याबाबत चर्चा केली. यावेळी आयुक्तांनी लवकरात लवकर समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. मनसेचे माजी आमदार, प्रदेश सरचिटणीस तथा शहर अध्यक्ष प्रकाश भोईर यांच्या नेतृत्वाखाली बऱ्याच काळानंतर मनसेचा अशाप्रकारे धडक मोर्चा निघाल्याने निवडणुकीच्या तोंडावर मनसेला नवसंजीवनी मिळाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

केडीएमसी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची घेतली भेट

नागरिकांना होणारा दूषित पाणी पुरवठा, अनियमित येणारी बिले, बंद असलेली उद्यानांची साफसफाई, स्मशानभूमीत लाकडांसाठी आकारले जाणारे पैसे, जलकुंभातील कामे त्वरित सुरू करावी, रुक्मिणीबाई रुग्णालयात आयसीयू सुरू करावा, काळा तलावमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे, केबल टाकण्याच्या कामांमध्ये रस्त्यांचे होणारे नुकसान, रिंग रोडचे बंद काम त्वरित सुरू करणे, होर्डिंगमुळे शहराचे होणारे विद्रूपीकरण, नालेसफाईच्या निविदा काढणे, बांधून तयार असलेले वैद्यकीय दवाखाने त्वरित सुरू करावे आदी मागण्यांसाठी मनसेच्या वतीने केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढला असल्याची माहिती मनसेचे माजी आमदार, सरचिटणीस तथा कल्याण शहर अध्यक्ष प्रकाश भोईर यांनी दिली.

यावेळी, मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, नयना प्रकाश भोईर, चेतना रामचंद्रन, उर्मिला तांबे, सुनंदा कोट, स्वाती कदम, कस्तुरी देसाई, तृप्ती भोईर, रेखा भोईर, अर्चना चीनदरकर, लक्ष्मी बोरकर, विनोद केणे, गणेश चौधरी,सचिन पोपलाईत, दिनेश भोये, कपिल पवार, सचिन शिंदे, पवन भोसले, गौरव जाधव, धनंजय पाटील, गणेश लांडगे, गणेश ढोनर, महेश बनकर, संदीप पंडित, प्रशांत इंगळे, दीपेश फुलवाडे, महेश पाटील, अभिजीत मालुजकर, दिनेश साळवी, सुनील वाडकर, भूषण भिसे, नीलेश जगदाळे, मिलिंद चौधरी, रूपेश पाटील, विराज चौधरी, मयूर भोईर, सदानंद टावरे, हर्ष गांगुर्डे, कुशल पवार, अविनाश भालेकर,यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *