नागरीकांना उपलब्ध होणार मूलभूत आणि पायाभूत सुविधा
कल्याण
कल्याण पश्चिम विधानसभेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने तब्बल 19 कोटींच्या विविध विकासकामांचे भूमीपूजन करण्यात आले. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक प्रभागामध्ये कोणत्या न कोणत्या विकासकामाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. ज्येष्ठ नगरसेवक जयवंत भोईर यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे भूमीपूजन करण्यात आले.
कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मतदार संघाच्या विकासासाठी निधीची मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत मोठया प्रमाणात विकासनिधी आमदार भोईर यांना उपलब्ध करून दिला आहे. याच निधीच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात विकासकामांसाठी आपण भरघोस निधी दिल्याची प्रतिक्रिया आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी दिली.
कल्याण पश्चिमेत होणार ही विकासकामे…
आमदार विश्वनाथ भोईर यांनी उपलब्ध करून दिलेल्या तब्बल 19 कोटी रुपयांच्या निधीतून सिमेंट काँक्रिटचे रस्ते, रस्त्यांचे डांबरीकरण, ड्रेनेज लाईन, पोहोच रस्ते, नाला – गटार, विद्युत व्यवस्था, मंदिर परिसर सुशोभीकरण, स्मशानभूमीमध्ये प्रतीक्षा गॅलरी बनवणे, ज्येष्ठ नागरिक कट्टा, वाचनालय बांधणे, तलावाला संरक्षक भिंत बांधणे अशा प्रकारच्या विविध विकासकामांचा समावेश आहे. ज्यातून कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना पायाभूत आणि मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी सांगितले.
आणखी बातम्या
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न
पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ ॲक्टिव्ह