December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

पोटे विद्यालयाने महिलांचा केला गौरव

कल्याण

कै. भाऊराव पोटे विद्यालयाने महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा सत्कार केला.

कवयित्री सुरेखा गावंडे, नगरपरिषद राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण शीतल चव्हाण, अंनिसची युवा कार्यकर्ती दुहिता जाधव, सायकलपटू नयना आघारकर, बिझनेस वूमन मनीषा सुर्वे, मिसेस डोंबिवली स्मिता धुमाळ, डॉक्टर सुरेखा जाधव, अभिनेत्री करुणा कातखेडे आणि पत्रकार नीलम चौधरी यांचा विद्यालयाच्या प्रांगणात सत्कार करण्यात आला.

यावेळी, पोटे ग्रुपचे सीएमडी बिपिन पोटे, केम्ब्रिया शाळेच्या व्यवस्थापकीय संचालिका मीनल पोटे, मुख्याध्यापक सुरेश वामन, शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकवर्ग उपस्थित होता.