कल्याण
दोन दिवसांपासून पूर्वेतील लोकधारा परिसरात अखंड रामायणाचे पाठ आयोजित करण्यात आला होता. लोकधारा परिसरातील रहिवाशांनी एकत्र येऊन सौहार्द मानव समिती लोकधारा, कल्याणची स्थापना केली. या समितीच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून गुढीपाडव्याच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाची सांगता आज संध्याकाळी होणार आहे. स्थानिक प्रतिष्ठित नागरिक तसेच परिसरातील महत्त्वाच्या मंडळींना येथे आमंत्रित केले जाते. व त्यांचा समितीच्या वतीने सत्कार होतो. या पाठांतरानंतर सगळीकडे शांतीचे व आनंदाचे वातावरण निर्माण होण्यासाठी सामुदायिक आरती आणि प्रार्थना केली जाते.
आणखी बातम्या
पिंपळवृक्षाची अंधश्रद्धेतून सुटका
यु टाईप रस्ता रुंदीकरणासाठी सह्यांची मोहीम
Kalyan : एमएफसी पोलिसांवर होतोय कौतुकाचा वर्षाव