December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

ठाणे

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत ठाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व महानगर पालिकामध्ये एकूण २ हजार ६१६ पात्र शाळा असून एकूण ३६ हजार ८२८ रिक्त जागा उपलब्ध आहेत.

आरटीई २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत बालकांच्या अर्ज नोंदणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून दिलेल्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new या वेबसाईटवर दि. १६ एप्रिल ते ३० एप्रिल रोजीपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पालकांसाठी मदत केंद्रांची यादी (Help Centers), ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज नोंदणीबाबत मार्गदर्शक पुस्तिका (User Manual), आवश्यक कागदपत्र इत्यादीबाबत सर्व माहिती शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

या प्रक्रियेसाठी पात्र असणाऱ्या (वंचित गट – SC/ST/NT/VJ/OBC/SBC , दुर्बल गट- १ लाखापेक्षा कमी उत्पन्न, दिव्यांग बालकांचे ४०% अपंगत्व असल्यास) जास्तीत जास्त पालकांनी प्रवेश प्रकियेत आपल्या बालकांची अर्ज नोंदणी करून सदर सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन शिक्षण विभाग (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.