ठाणे-डोंबिवलीत 20 ठिकाणी आयोजन
डोंबिवली व चेंबूर येथे भव्य रक्तदान शिबिरे
डोंबिवली
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संत निरंकारी मिशनच्या वतीने 24 एप्रिल रोजी ‘मानव एकता दिवस’ आयोजित करण्यात येत आहे. हा दिवस युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांचे परोपकारी जीवन व त्यांच्या लोक कल्याणकारी भावनेला समर्पित आहे. ‘मानव एकता दिवस’ मुख्य समारोहाचे आयोजन सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात दिल्ली येथे करण्यात आले असून ठाण्यातील कळवा, वागळे इस्टेट व मनोरमा नगर येथील सत्संग भवनांमध्ये तसेच मुंब्रा येथील पारसिक रेती बंदर दत्त चौक येथे विशेष सत्संग समारोहांचे आयोजन करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त डोंबिवली परिक्षेत्रामध्ये 16 ठिकाणी व मुंबईसह पश्चिम उपनगरांमध्ये 42 ठिकाणी हे आयोजन करण्यात आले आहे.
डोंबिवली परिक्षेत्रामध्ये मोठा गाव येथील संत निरंकारी सत्संग भवन, गोग्रासवाडी, सोनारपाडा, ठाकुर्ली, कल्याण, द्वारली पाडा, भिवंडी, भिसोळ, उल्हासनगर, विठ्ठलवाडी, अंबरनाथ, बदलापुर, टिटवाळा, वाशिंद, सावर्णे, शहापुर इत्यादी ठिकाण मानव एकता दिवस कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये त्या त्या भागातील स्थानिक भाविक भक्तगण मोठ्या संख्येने भाग घेतील आणि बाबा गुरबचनसिंहजी व मिशनचे अनन्य भक्त चाचा प्रतापसिंहजी यांच्या प्रति आपली श्रद्धा सुमने अर्पण करतील तसेच त्यांच्या महान जीवनातून प्रेरणा प्राप्त करतील.
संत निरंकारी मंडळाचे सचिव आणि समाजकल्याण विभागाचे प्रभारी जोगिन्दर सुखीजा यांनी माहिती देताना सांगितले, की सद्गुरुच्या असीम कृपेने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अवघ्या विश्वामध्ये विविध ठिकाणी संत निरंकारी मिशनची समाजकल्याण शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने रक्तदान शिबिरांच्या अविरत श्रृंखलेचे व्यापक स्तरावर आयोजन केले जाईल ज्यामध्ये मानवतेच्या भल्यासाठी रक्तदात्यांकडून रक्तदान करुन नि:स्वार्थ सेवेचे उदाहरण प्रस्तुत केले जाईल.
याच अभियाना अंतर्गत डोंबिवलीमध्ये संत निरंकारी सत्संग भवन, मोठा गाव, डोंबिवली आणि मुंबईतील संत निरंकारी सत्संग भवन, चेंबूर येथे 24 एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. युगद्रष्टा बाबा हरदेवसिंहजी यांनी सन् 1986 मध्ये सुरु केलेल्या रक्तदानाच्या परोपकारी मोहिमेने आता महाअभियानाचे रूप धारण केले असून त्याचा चरमोत्कर्ष झाल्याचे पहायला मिळत आहे. या शिबिरांमध्ये आतापर्यंत 13 लाख 31 हजार 906 युनिट रक्त मानवमात्राच्या भल्यासाठी दिले गेले असून या सेवा निरंतर जारी आहेत.
आणखी बातम्या
रविवारी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम
कुणबी, मराठा समाजातील युवती व महिलांसाठी मोफत प्रशिक्षण
केडीएमसीसाठी कुशीवली धरण आरक्षित करा : आमदार भोईर