December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

अनुलोम संस्थेमार्फत शंभर टक्के मतदानासाठी शिक्षक संवाद

कल्याण

कल्याण पूर्वेतील लोकग्राम परिसरात असलेल्या आनंद ग्लोबल शाळेत अनुलोम संस्थेच्या माध्यमातून शंभर टक्के मतदानसाठी चर्चा झाली. चर्चेदरम्यान, भारतात शंभर टक्के मतदान पूर्ण होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट करावी लागेल ती म्हणजे निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांची पूर्ण वेळ नियुक्ती करून निवडणूक आयोगाला स्वतःचे अधिकारी अशी स्वायत्तव्यवस्था उभी जर झाली. तर सुशिक्षित मतदार हा निवडणुकीला मोठ्या प्रमाणात उतरेल.

चर्चेदरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने जनजागृती अभियान राबवले आहे. त्यानुसार शाळेतील विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धा, जनजागृती रॅली, शिक्षक पालक संवाद, सेल्फी विथ परेंट्स आणि पथनाट्य असे विविध कार्यक्रम शाळेत होणार आहेत.

ज्याप्रमाणे स्वच्छ भारत अभियानाला आठ-दहा वर्ष झाले त्यानंतर आज भारतामध्ये स्वच्छता दिसून येत आहे. तसेच जनजागृती अभियान आणि निवडणूक आयोगाची स्वायत्तता कर्मचारी यंत्रणा जर राबवली गेली. तर दहा ते पंधरा वर्षातच भारत शंभर टक्के मतदानाचे उद्दिष्ट पूर्ण करेल.

या चर्चासत्रेत मुख्याध्यापक रूपाली पाटील, मुख्याध्यापक महेश पवार यांनी संयोजकाची भूमिका मांडली. कार्यक्रमासाठी सुंदर फलक लेखन हे आरती पवार यांनी केले. कार्यक्रमासाठी शाळेचे ट्रस्टी आशिष पाटील यांनी अनुमती दिली.