December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

केडीएमसी आयुक्त जाखड यांनी केले ध्वजारोहण

महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम केडीएमसीत उत्साहात संपन्न

कल्याण

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन कल्याण डोंबिवली महापालिकेत उत्साहात संपन्न झाला. महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी महापालिका मुख्यालयात ध्वजारोहण करून ध्वजवंदन केले. यावेळी राष्ट्रगीत गायन झाल्यावर शासन निर्णयानुसार राज्यगीताची ध्वनिफीत वाजवण्यात आली. यासमयी महापालिकेचे मुख्य लेख परीक्षक लक्ष्मण जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिग्विजय चव्हाण, उपायुक्त वंदना गुळवे, अतुल पाटील, प्रसाद बोरकर, धैर्यशील जाधव, माहिती व जनसंपर्क विभाग प्रमुख संजय जाधव, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, रोहिणी लोकरे यांच्यासह इतर अधिकारी वर्ग व कर्मचारी उपस्थित होते.

महापालिकेच्या डोंबिवली विभागातही अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपायुक्त रमेश मिसाळ, प्रभागांचे सहा. आयुक्त, इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर येथील १५० फुटी ध्वजाचे ध्वजारोहण महापालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले.