Power by The Web Cloud Media

आनंद ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केली मतदान जनजागृती

कल्याण

लोकसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान होण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी कल्याण पूर्वेतील आनंद ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. कल्याण पूर्वेतील लोकग्राम येथे सकाळी हे पथनाट्य सादर करण्यात आले.

सकाळी व्यायामासाठी गार्डन येथे येणाऱ्या लोकांसमोर, ज्येष्ठ नागरिक कट्टा येथे ही हे पथनाट्य पार पडले. मतदानासाठी जनजागृती व्हावी हे एकमेव उद्दिष्ट समोर ठेवून नाटक सादर झाले. आनंद ग्लोबल स्कूलचे प्राथमिक मुख्याध्यापक महेश पवार, शिक्षिका कविता काळे आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. संचालक आशिष पाटील यांनी संपूर्ण कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *