December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

Photo courtesy: Election Commission of India

कल्याण लोकसभा मतदार संघातील उमेदवारांची चिन्हे जाहीर !

डोंबिवली

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत, 24-कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांना काल चिन्हांचे वाटप करण्यात आले. ‍चिन्हवाटपाची संपूर्ण प्रक्रिया 24 कल्याण लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) मनोज जैन (भा.प्र.से.) यांच्या उपस्थितीत काल पार पडली. यावेळी 24 कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी सर्वप्रथम मान्यता प्राप्त राष्ट्रीय व राज्य पक्षांना तद्नंतर मान्यता प्राप्त नसलेल्या नोंदणीकृत पक्षांच्या उमेदवारांना व तद्नंतर अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप केले.

24-कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी रिंगणात असलेले उमेदवार व त्यांचे चिन्ह :-

1) प्रशांत रमेश इंगळे – बहुजन समाज पार्टी – हत्ती.

2) वैशाली दरेकर-राणे – शिव सेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) – मशाल.

3) डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे – शिव सेना – धनुष्यबाण.

4) अमीत उपाध्याय – राईट टू रिकॉल पार्टी – प्रेशर कुकर.

5) अरुण भाऊराव निटूरे – राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी – ऊस शेतकरी.

6) गवळी प्रविण शिवाजी – अपनी प्रजाहित पार्टी – सीसीटीव्ही कॅमेरा.

7) पूनम जगन्नाथ बैसाणे – बहुजन रिपब्लीकन सोशॅलीस्ट पार्टी – नागरीक.

8) श्रीकांत शिवाजी वंजारे – पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक) – फळांची टोपली.

9) श्रीधर नारायण साळवे – भीम सेना – ऑटो रिक्शा.

10) मो.सहाबुद्दीन शेख सुलेमानी ठाकूर – वंचित बहुजन आघाडी – गॅस सिलेंडर.

11) सुशीला काशिनाथ कांबळे – बहुजन समाज पार्टी (आंबेडकर) – माईक.

12) संभाजी जगन्नाथ जाधव – संयुक्त भारत पक्ष – हिरा.

13) हिंदुराव दादू पाटील –राष्ट्रीय मराठा पार्टी – रबर स्टँम्प

14) अजय श्याम मोर्या – अपक्ष – शिवण यंत्र.

15) अभिजीत वामनराव बिचुकले – अपक्ष – दूरदर्शन.

16) अमरिश राज मोरजकर – अपक्ष – तुतारी.

17) अरुण वामन जाधव – अपक्ष – लिफाफा.

18) अश्विनी अमोल केंद्रे – अपक्ष – कॅरम बोर्ड.

19) चंद्रकांत रंभाजी मोटे – अपक्ष – कॅमेरा.

20) नफिस अहमद अन्सारी – अपक्ष – बॅटरी टॉर्च.

21) प्राजक्ता निलेश येलवे – अपक्ष – खाट.

22) मोहम्मद यूसुफ खान – अपक्ष – शिट्टी.

23) राकेश कुमार धीसूलाल जैन – अपक्ष – सफरचंद.

24) शिवा कृष्णमूर्ती अय्यर – अपक्ष – बॅट.

25) डॉ. सचिन साहेबराव पाटील – अपक्ष – स्टेस्थोस्कोप.

26) सलीमउद्दीन खलीलउद्दीन शेख – अपक्ष – अंगठी.

27) ॲड. हितेश जयकिशन जेसवानी – अपक्ष – मनुष्य व शिड युक्त नाव.

28) ज्ञानेश्वर लोखंडे महाराज – अपक्ष – संगणक.