कल्याण
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला अवघे 10 दिवस शिल्लक राहिले असून भिवंडी लोकसभेतील एक महत्त्वाचा असलेला कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ शिवसेनेने पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने कल्याण पश्चिमेच्या कानाकोपऱ्यात प्रचार फेऱ्या आणि वैयक्तीक भेटी गाठींवर भर देण्यात आल्याचे दिसून येत आहे.
ठाणे जिल्ह्यातील एक प्रमूख आणि सर्वांचेच लक्ष लागून असलेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी महायुतीच्या सर्वच घटकपक्षांनी कंबर कसली आहे. येत्या 20 मे रोजी याठिकाणी पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्याला आता अवघा काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला असून सर्वच जण मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहेत. कल्याण पश्चिम विधानसभा हा भिवंडी लोकसभा मतदारसंघातील एक प्रमुख आणि निर्णायक मतदारसंघ संघ आहे. या पार्श्वभूमीवर आमदार विश्वनाथ भोईर यांनी संपूर्ण ताकदीनिशी महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून आमदार भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून कल्याण पश्चिम विधानसभेतील सापर्डे, वाडेघर, उंबर्डे, गांधारी, कोळीवली आदी सर्व गावे आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात एकत्रितपणे प्रचाराला जोरदार सुरुवात झाली. प्रचारफेरी सोबतच या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या वैयक्तीक भेटीगाठी घेऊन त्यांना महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना मतदान करण्याची विनंती केली जात आहे.
कपिल पाटील यांना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत – आमदार विश्वनाथ भोईर
20 तारखेला सर्वांनी मतदानासाठी बाहेर पडावे आणि आपला मतदानाचा हक्क बजावावा. महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी आपण सर्वांनी महायुतीच्या पारड्यात आपले अनमोल मत टाकण्याचे आवाहन यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी केले. तसेच कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भाग हा नेहमीच शिवसेना, भाजप, मनसे आदींच्या पाठीशी उभा राहिला आहे.
यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी जयवंत भोईर, प्रभूनाथ भोईर, उपशहर प्रमूख सुनिल खारुक, विभाग प्रमूख रामदास कारभारी यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
आणखी बातम्या
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न
पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ ॲक्टिव्ह