December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने वृक्षवाटप

कल्याण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने कल्याणमध्ये राजवृक्ष वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन महिला सेनेच्या कल्याण शहर अध्यक्षा कस्तूरी देसाई यांनी केले होते.

कल्याण पश्चिमेतील खडकपाडा सर्कल, कल्याण स्टेशन परिसर, अ प्रभाग अटाळी तसेच कल्याण पूर्वेत हे वृक्ष वाटप करण्यात आले. ‘झाडे लावा झाडे जगवा’ संदेश देत, नागरिकांना वृक्ष देऊन, राजवृक्ष साजरा करण्यात आला. वृक्ष वाटप करताना नागरिकांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला.

यावेळी, या कार्यक्रमाच्या आयोजक महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या कल्याण शहर अध्यक्षा कस्तुरी देसाई, महाराष्ट्र उपाध्यक्ष उर्मिला तांबे, जिल्हा सचिव वासंती जाधव, सुनीता शेलार, रेखा भोईर, कोमल राय, कोमल पाटील, संगीता कातकडे, अरुण गमरे आदी उपस्थित होते.